Pm Kisan Yojana केंद्रातील सरकारने 2019 मध्ये देशभरातील शेतकऱ्यांसाठी पी एम किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जात आहेत.
आतापर्यंत या योजनेच्या लाभार्थ्यांना 36 हजार रुपये मिळाले आहेत. मात्र हे पैसे शेतकऱ्यांना एकाच वेळी मिळाले नाहीत. दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे या योजनेअंतर्गत पैसे दिले जातात.
आगामी 2025 हे वर्ष शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. केंद्र सरकारने 2024-25 अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अनेक योजना व निर्णय जाहीर केले आहेत, ज्यामुळे शेतीसाठी आर्थिक तरतूद वाढली आहे. निर्मला सीतारामन यांनी PM Kisan योजना व कृषी क्षेत्राच्या विकासासाठी विशेष घोषणा केल्या आहेत.
महत्त्वाचे मुद्दे
- PM Kisan योजनेत वाढ:
PM-Kisan योजनेच्या वार्षिक निधीत 6,000 रुपयांऐवजी 8,000 रुपये करण्याची शक्यता आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत वाढणार आहे. - शेती तंत्रज्ञान आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन:
पुढील दोन वर्षांत एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळवले जाणार आहे. तसेच, डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरद्वारे शेतीची माहिती नोंदवली जाईल, ज्यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळेल. - कृषी क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटींची तरतूद:
अर्थसंकल्पात शेती क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करण्यात आला आहे, ज्यात हवामान बदल-प्रतिबंधात्मक वाण आणि सौर कृषीपंपांसाठी प्रोत्साहन यांचा समावेश आहे. - सौर कृषीपंप योजना आणि GST सवलत:
शेतकऱ्यांना सौर कृषीपंप देण्याची योजना राबवली जाईल. याशिवाय, कृषी उपकरणांवरील GST कमी करण्याची शक्यता आहे, ज्यामुळे उपकरणे स्वस्त होतील. - किसान क्रेडिट कार्डसाठी सुलभ प्रक्रिया:
शेतकऱ्यांना सहजपणे किसान क्रेडिट कार्ड मिळावे यासाठी प्रक्रिया सुलभ करण्यात येणार आहे.
योजना कशा फायदेशीर ठरणार?
- आर्थिक मदतीत वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांचे कुटुंब स्थिर होईल.
- नैसर्गिक शेतीमुळे जमिनीची उत्पादकता टिकून राहील.
- सौर ऊर्जेचा वापर वाढल्यामुळे ऊर्जा खर्च कमी होईल.
- डिजिटल नोंदणी व तंत्रज्ञानामुळे शेतीत पारदर्शकता व प्रभावीता वाढेल.
Pm Kisan Yojana अशा तऱ्हेने आत्तापर्यंत एकूण 18 हप्त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 36,000 रुपयाचा निधी देण्यात आला आहे. दरम्यान, आता या योजनेला पाच वर्षांहून अधिकचा काळ उलटला असल्याने आणि या योजनेची लोकप्रियता पाहता सरकार यामध्ये मोठा बदल करण्याची शक्यता आहे.
येत्या अर्थसंकल्पात पीएम किसान सन्मान निधी योजनेसंदर्भात मोठी घोषणा होणार असे बोलले जात आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी शेतकरी प्रतिनिधी आणि कृषी क्षेत्रातील भागधारकांची बैठक घेतली.
वाचा : “1 रुपयात पीक विमा: रब्बी पीक विमा योजनेंची संपूर्ण माहिती” pik vima
अर्थसंकल्पापूर्वी झालेल्या या बैठकीत या प्रतिनिधींनी अर्थमंत्र्यांना कृषी क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी अनेक महत्त्वाच्या सूचना केल्यात. पी एम किसान सन्मान निधी योजनेबाबतही या प्रतिनिधींनी मोठी मागणी केली आहे. दीर्घ कालावधीसाठी स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करून देणे, कृषी उत्पादनांवरील कर कमी करणे आणि पीएम-किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम दुप्पट करणे अशा मागण्या या प्रतिनिधींनी यावेळी उपस्थित केल्या.
दोन तास चाललेल्या या बैठकीत कृषी क्षेत्राशी संबंधित आव्हाने सोडविण्याच्या उद्देशाने अनेक प्रस्तावांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रस्तावांमध्ये आर्थिक दिलासा, बाजार सुधारणा आणि धोरणात्मक गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या प्रमुख मागण्यांचा समावेश होता.
यामुळे आगामी काळात केंद्रातील सरकार पीएम किसान सन्मान निधी योजनेची रक्कम वाढवण्याबाबत विचार करण्याची शक्यता आहे. पुढल्या वर्षी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार असून या केंद्रीय अर्थसंकल्पात पीएम किसान योजनेची सध्याची 6000 रुपयांची रक्कम 12000 रुपये केली जाऊ शकते असा दावा आता होऊ लागला आहे.
यामुळे खरंच केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी पीएम किसान योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम 12000 रुपयांपर्यंत वाढवतात का हे पाहण्यासारखे ठरणार आहे.